13.6 C
New York
Sunday, April 12, 2026

Buy now

spot_img
spot_img

​कात्रजमध्ये नियमबाह्य खोदकामाचा प्रताप; पालिकेची परवानगी न घेता मुख्य रस्ता उकरला..

पुणे (कात्रज): शहरातील वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या कात्रज ते लेक टाऊन दरम्यानच्या मुख्य रस्त्यावर सध्या विनापरवाना खोदकाम सुरू असून, यामुळे परिसरातील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. ‘नॅन्सी लेक होम’ सोसायटीच्या समोर सुरू असलेले हे खोदकाम पुणे महानगरपालिकेची कोणतीही अधिकृत परवानगी न घेता केले जात असल्याचे समोर आले आहे.

नेमका प्रकार काय?

कात्रज ते लेक टाऊनला जोडणारा रस्ता हा वर्दळीचा रस्ता मानला जातो. गेल्या काही तासापासून या रस्त्यावर नॅन्सी लेक होम सोसायटीच्या वतीने खोदकाम सुरू करण्यात आले आहे. या खोदकामामुळे रस्त्याचा बराचसा भाग उखडला गेला असून वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे.

ठेकेदाराचे धक्कादायक उत्तर

जेव्हा स्थानिक नागरिक आणि जागरूक व्यक्तींनी या खोदकामाबाबत संबंधित ठेकेदाराला विचारणा केली, तेव्हा धक्कादायक माहिती समोर आली. ठेकेदाराने सांगितले की, “या कामासाठी महानगरपालिकेची रीतसर परवानगी घेतली आहे की नाही, याची आम्हाला काहीही कल्पना नाही. आम्हाला सोसायटीचे चेअरमन आणि स्थानिक प्रतिनिधींनी हे काम करण्यास सांगितले आहे, म्हणूनच आम्ही खोदकाम करत आहोत.”

प्रशासनाचे दुर्लक्ष?

नियमानुसार, कोणत्याही सार्वजनिक रस्त्यावर खोदकाम करण्यासाठी महानगरपालिकेच्या पथ विभागाची (Road Department) पूर्वपरवानगी घेणे आणि त्याचे शुल्क भरणे अनिवार्य असते. मात्र, येथे केवळ स्थानिक नेत्यांच्या किंवा सोसायटीच्या सांगण्यावरून मुख्य रस्ता खोदला जात असल्याने ‘प्रशासनाचा धाक राहिला नाही का?’ असा सवाल उपस्थित केला जात आहे.

या खोदकामामुळे भविष्यात अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. तसेच, विनापरवाना रस्ता खोदल्यामुळे महापालिकेचे आर्थिक नुकसानही होत आहे. आता या प्रकरणावर पुणे महानगरपालिका प्रशासन काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या