13.6 C
New York
Sunday, April 12, 2026

Buy now

spot_img
spot_img

पुणे: कोंढवा बुद्रुकमधील ‘राजमाता कॉलनी’त अवैध दारू विक्रीचा सुळसुळाट; पोलिसांचे अर्थपूर्ण दुर्लक्ष?

पुणे:कोंढवा बुद्रुक येथील राजमाता कॉलनी, सर्वे नं. ४८ परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून अवैध दारू विक्रीचा व्यवसाय जोरात सुरू असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. या अवैध धंद्यामुळे स्थानिक नागरिक, विशेषतः महिला आणि लहान मुलांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

प्रेमसिंह राठोड नावाच्या व्यक्तीकडून संचलन

मिळालेल्या माहितीनुसार, या परिसरातील अवैध दारू विक्रीचा मुख्य सूत्रधार प्रेमसिंह राठोड असल्याची चर्चा आहे. कोणत्याही परवान्याशिवाय भरवस्तीत सुरू असलेल्या या धंद्यामुळे रात्री-अपरात्री तळीरामांचा वावर वाढला असून, परिसरात भांडण-तंट्यांचे प्रमाणही वाढले आहे. नागरिकांनी अनेकदा तोंडी तक्रारी करूनही हा व्यवसाय बिनदिक्कत सुरू असल्याचे दिसून येत आहे.

पोलीस हवालदारावर भ्रष्टाचाराचे आरोप

या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, या अवैध धंद्याला स्थानिक पोलिस व पुणे राज्य उत्पादन शुल्कचे  अभय असल्याचे बोलले जात आहे. परिसरातील रहिवाशांनी नाव न सांगण्याच्या अटीवर आरोप केला आहे की, पोलीस हवालदार अक्षय शेडगे हे या व्यवसायाकडून ‘हप्ता’ (लाच) स्वीकारत आहेत. यामुळेच पोलिसांकडून कोणतीही ठोस कारवाई केली जात नसल्याचा दाट संशय व्यक्त केला जात आहे.

नागरिकांची मागणी

“आमच्या कॉलनीत सुरक्षितपणे राहणे कठीण झाले आहे. दारू पिणाऱ्यांमुळे महिलांची छेडछाड आणि शिवीगाळीचे प्रकार घडत आहेत. जर पोलीसच लाच घेऊन या गुन्हेगारांना साथ देत असतील, तर आम्ही दाद कोणाकडे मागायची?” असा संतप्त सवाल रहिवाशांनी उपस्थित केला आहे.

आता याप्रकरणी पुणे पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ अधिकारी संबंधित हवालदाराची चौकशी करून हा अवैध धंदा कायमचा बंद करणार का, या भ्रष्ट पोलिसावर कारवाई होईल का ?याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या