पुणे: दक्षिण पुण्यातील कात्रज, कोंढवा, पिसोळी, उंद्री आणि हंडेवाडी यांसारख्या वेगाने विकसित होणाऱ्या भागात सध्या ऑनलाईन देहविक्रीच्या व्यवसायाने डोके वर काढले आहे. ‘जांगळे’ नावाचा च्या व्यक्तीच्या अकाउंटला ऑनलाईन पैसे स्वीकारले जातात. एक इसम एका विशिष्ट व्हॉट्सॲप नंबरद्वारे (८७६७९४५५४०) हे संपूर्ण रॅकेट चालवत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. विशेष म्हणजे, ट्रूकॉलरवर या नंबरची तपासणी केली असता त्यावर ‘मानसी जगताप’ असे नाव दर्शवले जात असल्याने, तपास यंत्रणांची दिशाभूल करण्यासाठी बनावट नावाचा वापर केला जात असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
अशी आहे रॅकेटची कार्यपद्धती
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित व्हॉट्सॲप नंबरवरून ग्राहकांना तरुणींचे फोटो पाठवले जातात. दर आणि ठिकाण निश्चित झाल्यानंतर ग्राहकांना कात्रज, कोंढवा किंवा हांडेवाडी परिसरातील ठराविक लॉजवर बोलावले जाते.
ट्रूकॉलरवर नावाचा घोळ
या रॅकेटचा पैसे स्वीकारणारा ‘जांगळे’ नावाने ओळखला जात असला तरी, तो वापरत असलेल्या मोबाईल नंबरवर (८७६७९४५५४०) ट्रूकॉलरवर ‘मानसी जगताप’ असे नाव दिसत आहे. गुन्हेगारी कृत्य लपवण्यासाठी कोणा महिलेच्या नावावर सिमकार्ड घेतले आहे का, याचा शोध घेणे आता पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे.
परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण
कात्रज, कोंढवा, उंद्री आणि हंडेवाडी या निवासी भागात अशा प्रकारचे अवैध व्यवसाय सुरू असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये संतापाचे आणि भीतीचे वातावरण आहे. अशा रॅकेटमुळे परिसरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असून, तरुण पिढीवर याचे वाईट परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
पोलिस प्रशासनाकडून कारवाईची अपेक्षा
पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने या व्हॉट्सॲप नंबरची आणि त्यामागे असलेल्या ‘जांगळे’ नावाच्या व्यक्तीची सखोल चौकशी करावी, अशी मागणी नागरिक करत आहेत. हा रॅकेट चालक कोणत्या लॉज मालकांशी संगनमत करून हा व्यवसाय चालवत आहे, हे शोधणे आवश्यक आहे.



