16.1 C
New York
Tuesday, June 3, 2025

Buy now

spot_img
spot_img

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंविरोधात उमेदवार देणार नाही, मनसेचं ठरलं…

विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सर्व राजकीय पक्ष उमेदवार याद्या जाहीर करत आहेत, अशातच एक मोठी बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात मनसे उमेदवार देणार नसल्याची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री यांच्यासोबत असलेल्या मैत्रीपूर्ण संबंधांमुळे उमेदवार देणार नसल्याची माहिती समोर आली आहे. जरी अमित ठाकरे यांच्या विरोधात शिवसेनेने सदा सरवणकर यांनी उमेदवारी जाहीर केली असली तरी राज ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात उमेदवार देणार नसल्याची माहिती समोर आली आहे. कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून धर्मवीर आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या मतदारसंघामध्ये बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचा मोठा समर्थक वर्ग आहे. त्यामुळे कोपरी पाचपाखाडीतून शिवसेना (ठाकरे गट) विरुद्ध शिवसेना (शिंदे गट) असा सामना रंगणार आहे. केदार दिघे यांच्यामुळे एकनाथ शिंदेंना मोठं आव्हान निर्माण झालं आहे. कोपरी पाचपाखाडी मतदार संघात अभिजित पानसे यांची उमेदवारी निश्चित झाली होती, मात्र आता उमेदवारी न देण्याचा निर्णय पक्षाकडून घेण्यात आला आहे. कोकण पदवीधर मतदार संघातून देखील अभिजित पानसे यांना उमेदवारी मागे घेण्यास सांगण्यात आले होते. कोपरी पाचपाखाडी मतदारसंघ 2009च्या आधी ठाणे शहर मतदारसंघात समाविष्ट होता. नंतर मतदारसंघाच्या पुनर्रचनेत कोपरी पाचपाखाडी हा स्वतंत्र मतदारसंघ तयार झाला. तेव्हापासून एकनाथ शिंदे या मतदारसंघाचे नेतृत्त्व करत आहेत.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या