पुणे :- कोंढवा परिसरात गेल्या काही महिन्यापासून मोठ्या प्रमाणात सुरू असलेले अनधिकृत बांधकामावर अखेर महापालिकेने लक्ष घालून कारवाई सुरू केले आहे. यासाठी महापालिकेने बांधकाम परवाना विभागाचे काही अधिकारी नियुक्त करण्यात आले असून, बेकायदा इमारतींचे शोध घेऊन त्या जमीनदोस करण्याचे मोहीम हाती घेण्यात आली आहे.
कोंढवा, कोंढवा बुद्रुक तसेच येवलेवाडी या भागात परवानगी न घेता 1 गुंठ्यामध्ये ४ ते ५ मजली बेकायदा इमारती उभ्या राहत आहेत. बांधणाऱ्या बिल्डरांना कमी खर्चामध्ये जास्त पैसे मिळत असल्यामुळे परवानगी न घेण्याच आता या बिल्डरांनी ठरवला आहे. पुणे महानगरपालिकेकडून वारंवार कारवाई होत असताना देखील सदर बिल्डर हे अधिकाऱ्यांना मॅनेज करण्याचे काम करतात व अधिकाऱ्यांकडून कारवाईच्या स्वरूपात थोडीफार भिंत व एखाद्या स्लॅबला होल मारणे इतकीच कारवाई कराय सांगतात. अशा स्वरूपाची कारवाई होती त्यामुळे कोंढवा बुद्रुक, कोंढवा व येवलेवाडी येथील बिल्डरांना पुणे महानगरपालिकेचे भीती राहिली नाही.
असाच एक प्रकार कोंढवा बुद्रुक सर्वे नंबर ३ गल्ली नंबर ८ लक्ष्मी नगर येथे सुरू आहे. १ गुंठ्यामध्ये ५ मजली चढवण्याचं धाडस येथील चोंदे नावाचा व्यक्ती करत आहे. येथील राहणाऱ्या आजूबाजू घरांना खेटून ५ मजली ची इमारत बांधण्याचे धाडस कोणाच्या जीवावर? येथील राहणाऱ्या रहिवाशांची विचारपूस केल्यास असे कळले की सदर बिल्डरच्या बोलण्यातून अस कळाल की बिल्डरचे स्थानिक राजकीय पुढार्यांशी तसेच अधिकाऱ्यांशी चांगले संबंध असल्यामुळे त्याच्या बिल्डिंग वरती कारवाई होणार नाही.
सदर अनधिकृत बांधकामावर पुणे महानगरपालिका अधिकारी कारवाई करतील का यावर सर्व नागरिकांचे लक्ष लागून आहे कारण की या अगोदर देखील सदर बिल्डरने कोंढवा बुद्रुक मधील अनधिकृत इमारत बांधले आहेत. येथील रहिवाशांनी पुणे महानगरपालिकेला देखील ऑनलाईन तक्रार करून देखील सुद्धा या बिल्डिंगवर कारवाई होत नसल्याने अधिकाऱ्यांचे या बिल्डरशि किती चांगले संबंध आहे असे दिसून येत आहे. यावर पुणे महानगरपालिका आयुक्त सदर अधिकाऱ्यांवरती कारवाई करतील का? ५ मजले अनधिकृत बांधकाम चढवणाऱ्या बिल्डर वर पुणे महानगरपालिका जमीनदोस करण्याची कारवाई करतील का असा प्रश्न जनतेच्या मनात उद्भवला आहे.