पुणे : कोंढवा परिसरात गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांवर अखेर महापालिकेने लक्ष घालून कारवाई सुरू केली आहे. यासाठी महापालिकेच्या बांधकाम परवाना विभागाच्या ४० अभियंत्यांची नियुक्ती करण्यात आली असून, बेकायदा इमारतींचा शोध घेऊन त्या जमीनदोस्त करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे.
कोंढवा, कोंढवा बुद्रुक या भागांत परवानगीविना ४ ते ५ मजली बेकायदा इमारती उभ्या राहत आहेत. या ठिकाणी कमीत कमी किमतीत फ्लॅट विकले जात असून, काहीजण भाड्याने देऊन उत्पन्न घेत आहेत. यामुळे नागरिकांची फसवणूक होत असून, याबाबत राज्याच्या अधिवेशनातही तक्रारी करण्यात आल्या होत्या. आता या बेकायदा इमारतींविरोधात गुन्हे दाखल करण्याचाही निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
असाच एक प्रकार कोंढवा बुद्रुक सर्वे नंबर ३ लक्ष्मी नगर गल्ली नंबर ८ समोर ५ मजला अनधिकृत बांधकाम तसेच त्यावर अजून बांधकाम करायचं काम चालू आहे. बांधकाम संदर्भात विचारपूस केल्यास असे कळाल की इनामदार यांचे पुणे महानगरपालिका अधिकाऱ्यांची संबंध असल्याकारणामुळे यांच्या अनधिकृत बांधकाम वर कारवाई करण्यात आली होती मात्र नावाला दाखवण्यापूर्ती कारवाई करण्यात आली कारवाई झाल्याच्या दुसऱ्या दिवसापासून इनामदार यांनी परत त्यांच्या अनधिकृत बांधकामाचे काम दुप्पट वेगाने सुरू केले व अधिकारी उदय पाटील यांना वारंवार स्थानिक आणि तक्रार तसेच ऑनलाईन तक्रार करून देखील अधिकारी कारवाई करण्यास टाळाटाळ करताना दिसत आहे. मात्र स्थानिकांना हे कळंना की सदर बिल्डरला पाठबळ अधिकाऱ्यांचा? की राजकीय नेत्यांचा?
सदर अनधिकृत बांधकामावर पुणे महानगरपालिका अधिकारी कारवाई करतील का यावर सर्व नागरिकांचे लक्ष लागून आहे कारण की या अगोदर देखील इनामदार यांनी कोंढवा बुद्रुक सर्वे नंबर ३ गल्ली नंबर ५ येथे देखील ५ मजले अनधिकृत बांधकाम उभारले आहे सदर बांधकामाचे देखील पुणे महानगरपालिकेला तक्रार केली असताना देखील अधिकाऱ्यांकडून फक्त नोटीस देण्यात आली त्या व्यतिरिक्त कुठलेही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही असं येतील स्थानिकांचे म्हणणे आहे. असे अनेक अनिकृत बांधकाम इनामदार यांनी पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून उभारले आहे या अधिकाऱ्यांवर पुणे महानगरपालिका कारवाई करेल का? असा प्रश्न येथील जनतेच्या मनात उद्भवला आहे.